पनवेलकरांना घडणार लालबागच्या राजाचे दर्शन ..

महात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना गौरा गणेशोत्सवाचे ३० वे वर्ष ...

पनवेल / वार्ताहर - : भक्तांचे दुःख हरण करणारा व ज्याच्या दर्शनासाठी लाखो भक्तांचा सागर लोटतो त्या लालबागच्या राजाचे दर्शन कोविड मुळे दोन वर्ष प्रतीक्षेनंतर पनवेलकरांना होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना श्रीगौरा गणेश उस्तवा निमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये १३ सप्टेंबर २०२२ ला विराजमान केली जाणार आहे. 
संघटनेचे गौरा गणेश उस्तवाचे ३० वे वर्ष असुन सामाजिक बांधिलकी जोपासुन श्रीगौरा गणेश उस्तव मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखोंच्या उपस्थितीत शांततामय साजरा केला जात असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगीतले आहे. पनवेल मधिल महात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना व फळभाजी विक्रेते सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने गेल्या २९ वर्षापासुन गौरा गणेश उस्तव साजरा केला जात आहे . संघटनेचे जवळपास तीन हजारापेक्षा जास्त सभासद असुन यामध्ये छोटे मोठे व्यवसाय करुन आपले उदरनिर्वाह करणारयांचा सहभाग मोठया संख्येन आहे . गौरा गणेश उस्तव साजरा करण्यामागची संकल्पना सांगताना महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगितले की पनवेल तालुक्यात गणेश उस्तव साजरा होत असताना गणेश भक्ताना गणरायासाठी आवश्यक असणारे साहीत्य विक्री करण्यात येथील छोटे व्यवसायीक गुतंलेले असतात त्यावेळी गणेश उस्तवाचा आनंद घेता येत नाही सर्वच सघटनेचे सभासद गणेश उस्तव मोठया उस्ताहाने साजरा करु शकत नाहीत यासाठीच संघटनेने २९ वर्षापुर्वी गौरा गणेश उस्तव साजरा करण्याची सुरवात केली. १३ सप्टेंबर २०२२ ला सकाळी ७ वाजता श्रीगौरा गणेशपूजन होणार असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगितले. उस्तवाच्या प्रारंभी वेगवेगळया मुर्तिची प्रतिष्ठापणा केली जात होती . परतू गेल्या २३ वर्षापासुन लालबागच्या राज्याची प्रतिकृती पनवेल मध्येच तयार करुन स्थापना केली जात आहे . लालबागच्या राजाची मुर्ति साकारणारे संतोष कांबळी व त्यांचे ईतर सहकार गेल्या पंधरा ते विस दिवसापांसुन पनवेल मध्ये गणेश मुर्ति साकारण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत तसेच राजाचे धोतर सजवण्याचे काम रुपेश पवार करीत आहेत. गौरा गणेश उस्तव साजरा करीत असताना सर्व धर्मिय जात पात वंश भेद विसरून एक दिलाने काम करीत असतात. याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादाचा लाभ जवळपास साठहजारापेक्षा जास्त गणेश भक्त घेत असतात असे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या गौरा गणेश उत्सवाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक यांनी सांगितले. पनवेलमधिल मार्केटच्या राज्याचे दर्शन घेण्यासाठी मुंबई , ठाणे , नवीमुंबई तसेच रायगड जिल्हयातुन पाच लाखांच्यापेक्षा जास्त भाविक आपली हजेरी लावतात. लालबागच्या राजाचे दर्शन झाले नाही असे भाविक व पुर्ण केलेल्या मनोकामनाचे नवस फेडण्यासाठी भक्त पनवेलकडे धाव घेतात. 
दिड दिवसांनंतर मोठ्या दिमाखात शाही थाटात राजाचे विर्सजन १४ सप्टेंबर २०२२ ला होणार असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या गौरा गणेश उत्सवाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक यांनी सांगितले.
Comments