दोन वाहनांमधील अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी...
दोन वाहनांमधील अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी


पनवेल दि.०३ (संजय कदम) : मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर शोल्डर लेनवर थांबलेल्या ट्रकवर टेम्पोने धडक देऊन झालेल्या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाल्याची घटना खान्देश्वर परिसरात घडली आहे. 

सुरेंद्रकुमार रामप्रसाद (रा.सुलतानपूर ,उत्तर प्रदेश) हे आपल्या ताब्यातील टाटा  टेम्पो  क्र. MH 04 HY 4628 घेऊन मुंबई बाजूकडे तिसरे लेनने जात असताना झोपेची डुलकी आल्याने त्यांचे पुढे शोल्डर लेनवर थांबलेल्या  टाटा ट्रक  क्र. MH 11 AL 8900 यास पाठीमागून डाव्या बाजूस  जोरात धडक देऊन अपघात झाला आहे. सदर अपघातात टेम्पोचालकाला छातीला स्टिअरिंग लागून मुका मार बसून किरकोळ दुखापत झाल्याने MGM हाॅस्पिटल कामोठे येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आला आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फोटो : दोन वाहनांमधील अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी
Comments