डायबेटीस हेल्थ फाउंडेशन व श्री हनुमान मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर संपन्न..
मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

पनवेल/प्रतिनिधी : - डायबेटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेलवासी समस्त देशस्थ मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन श्री हनुमान मंदिर, लाईन आळी, शिवाजी रोड येथे शनिवार दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.

शिबिरामध्ये मधुमेह होण्याच्या धोक्याची गुणसंख्या (डी.आर.एस), मधुमेह तपासणी (आर.बी.एस), उच्च रक्तदाब तपासणी, उंची, वजन, आणि बी.एम.आय, मधुमेह तज्ञाकडून तपासणी व मार्गदर्शन तसेच फुफ्फुसाची क्षमता यांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी पंचावन्न (५५) नागरिकांनी याचा लाभ घेतला.

यावेळी ट्रस्टी अमित धावडे, डॉ.प्राची पाटील, मुख्य प्रबंधक प्रशांत गायकवाड, प्रबंधक नितीन सरगर, परिचारिका सना शेख, सलमान सुरमे, त्याचप्रमाणे मंदिरातर्फे अध्यक्ष अनिल कुरघोडे, विश्वस्त राजेंद्र आमले, सेवेकरी अशोक पडवळ, शिवा पुजारी आदींचे सहकार्य लाभले.
Comments