मानवी सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ ...
मानवी सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ...

पनवेल दि. ३० ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील डेरवली गाव परिसरात एक मानवी सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे . 
                  डेरवली गाव परिसरातील दर्गाजवळ एक मानवी सांगाडा आढळला आहे.  त्या ठिकाणी एका बांधकाम व्यावसायिकांच्या जागेवर वाढलेले गवत काढण्याचे काम सुरु असताना तेथील उपस्थित कामगारांना हा मानवी सांगाडा आढळून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती पनवेल तालुका पोलीसांना दिली असून त्यानुसार पोलीसांच्या पथकांनी सदर ठिकाणी जाऊन तो मानवी सांगाडा ताब्यात घेतला आहे . याबाबत अधिक तपास  पनवेल तालुका पोलीस करीत आहेत .
Comments