१ लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षक गजाआड...


महामार्ग सुरक्षा पथक पनवेल विभागाचे निरीक्षक -  पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 

पनवेल दि 21(वार्ताहर):- पोलीस कर्मचाऱ्यांची इच्छित स्थळी बदली करण्यासाठी 1लाख रुपयाची लाच मागणारे, महामार्ग सुरक्षा पथक पनवेल विभागाचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे याना  1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्या पथकाने  रांगेहात अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी 20 सप्टेंबर रोजी उशिरा झाली आहे. 
     महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे वय 58 वर्ष यांनी, आपल्या पोलीस दलातील सहकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांची इच्छित स्थळी बदली करण्यासाठी साठी दोन कर्मचाऱ्यांकडून 1 लाख रुपयांची मागणी केली होती 1 लाख रुपये  दिल्या नंतर तत्काळ बदली होईल अशे आश्वासन वारे यांनी त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांना दिले होते, त्या नुसार 1 लाख रुपयांची जुळवाजुळव  दोन पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केली होती, तसेच या पोलीस अधिकाऱ्यांनी या लाचेची माहिती पालघर लाचलुचपत विभागाला दिली होती, त्या नुसार पालघर पथकांनी मंगळवारी सापळा  रचून वारे याना त्याच्या केबिन मध्ये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे., वारे यांनी त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना पैसे घेऊन केबिन मध्ये बोलवले होते, त्या नुसार लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
Comments