डॉ.ज्योती मेटे यांना विधान परिषदेचे आमदार करा ; शिवसंग्रामचे अमर वामन यांची मागणी..
शिवसंग्रामचे अमर वामन यांची मागणी

पनवेल /प्रतिनिधी :
मराठा समाजाचे नेते स्व विनायक मेटेसाहेब आपल्यातुन गेल्याने मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विनायक मेटे हे मराठा समाजाला आरक्षण  मिळण्याकरिता शासन दरबारी आवाज उठवत होते. आता समाजाचा आवाज शासनापर्यंत. पोहोचवण्याकरिता  मेटे साहेबांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्ती कोठ्यातून विधान परिषदेचे आमदार करून कॅबिनेट मध्ये घ्यावे अशी मागणी शिवसंग्राम चे  सरचिटणीस अमर वामन यांनी केली आहे. 
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षण व छत्रपती शिवाजी महाराज स्मारका संदर्भ मध्ये अधिवेशनात कुणीही मुद्दा मांडला नाही. स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांची पोकळी मराठा समाजामध्ये  जाणवली आहे. शिवसंग्राम चे संस्थापक मेटे साहेब यांनी वेळोवेळी  समाजाच्या हिताचा साठी  शासनासमोर  आवाज उठवत समाजाच्या समस्या संदर्भाने मांडत आले होत. बहुजन समाजासाठी सुद्धा सातत्याने अधिवेशनात  मुद्दे उपस्थित करून शासनासमोर प्रश्न उपस्थित करून  त्यावर विचार करण्यास भाग पाडत होते. स्वर्गीय विनायक मेटे यांची पोकळी भरून काढण्याकरिता त्यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांना विधान परिषदेचे आमदार केल्याने समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोचू शकतील असे मत शिवसंग्राम चे महाराष्ट्र सरचिटणीस अमर वामन यांनी व्यक्त केले.
Comments