भरधाव गाडीच्या धडकेने दोघेजण जखमी...
भरधाव गाडीच्या धडकेने दोघेजण जखमी

पनवेल / दिनांक २३ (वार्ताहर)
 पनवेल जवळील गार्डन हॉटेल सिग्नल जवळ एका भरधाव गाडीने मोटार सायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटासायकलवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
      संतोष माने हे त्यांच्या ताब्यातील गाडी घेऊन भरधाव वेगाने जात असताना त्यांनी हॉटेल गार्डन जवळील सिग्नल जवळ एका मोटार सायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात हृत्विक कोडथे व त्याचा मित्र रोशन हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments