पर्स मध्ये ठेवलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी ...
पर्स मध्ये ठेवलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी 

पनवेल दि. ०५ ( संजय कदम ) : भाजीपाला खरेदी करण्याकरिता एक महिला घरा बाहेर पडली असताना तिने कापडी पिशवी मध्ये सोन्याचे मंगळसूत्र ठेवले असता अज्ञात चोरट्याने सदर मंगळसूत्र चोरल्याची घटना पनवेल जवळील करंजाडे येथे घडली आहे . 
                   भक्ती वायभासे ( वय २२ ) रा. से. ०५ करंजाडे या तेथील टाटा पॉवर समोरील रस्त्यावर भाजीपाला खरेदी करण्याकरिता गेल्या असताना त्यांनी ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र कापडी पिशवी मध्ये ठेवले असतांना अज्ञात चोरट्याने सदर मंगळसूत्र चोरल्याची  तक्रार त्यांनी पनवेल शहर  पोलीस ठाण्यात दिली आहे .
Comments