पनवेल परिसरात तीन मोटारसायकलींची चोरी..
पनवेल परिसरात तीन मोटारसायकलींची चोरी..


पनवेल / दि.7 (संजय कदम) : पनवेल परिसरातून तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकली चोरी झाल्याची घटना घडल्याने गाडीमालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. 
पनवेल येथील रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्याच्या कडेला धीरज परदेशी यांनी त्यांची २५ हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची यामाहा एफ झेड मोटारसायकल क्रं. एमएच ४६ वाय ७५७८ हि उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. तर दुसऱ्या घटनेत संतोष वाघ याने त्यांची १० हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र. एमएच ०६ एडी ६००३ हि नवीन पनवेल सिग्नल जवळील ब्रिजच्या उजव्या बाजूच्या रस्त्यावर उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे तर तिसऱ्या घटनेत प्रसाद पाटील यांची काळ्या रंगाची १५ हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्रं. एमएच ०६ एयु ०७९७ हि आश्रय सोसायटी, परदेशी आळी येथे उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
Comments