स्कूटी गाडीची डीव्हायडर ला धडक, चालक जखमी...
स्कूटी गाडीची डीव्हायडर ला धडक, चालक जखमी

पनवेल दी २३( वार्ताहर)
स्कुटी वरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगईने व निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील डिव्हायडर ला धडकून झालेल्या अपघातात तो स्वतः जखमी झाल्याची घटना पळस्पे फाटा राहुल पार्क हॉटेल समोर घडली आहे.
      सुयोग कांबळे वय ३७ राहणार डेरवली हा जेएनपीटी कडून पुणे दिशेने जात असताना पळस्पे फाटा राहुल पार्क हॉटेल समोर त्याने त्याच्या ताब्यात असलेली स्कुटी क्रमांक एम एच ४६ ए वाय ५३८२ ही डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात तो स्वतः जखमी झाल्याने याबाबतची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच या अपघातात स्कुटीचे देखील नुकसान झाले आहे.
Comments