खासदारांकडून बिमाच्या राजाचे दर्शन मंडळाचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी केले स्वागत..
रामदास शेवाळे यांनी केले स्वागत

पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : कळंबोलीतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिमाचा राजाचे  मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दर्शन घेतले. बिमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी बारणे यांचे स्वागत केले. यावेळी इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
                           कळंबोली बिमा कॉम्प्लेक्स येथे दरवर्षी गणेश उत्सव साजरा केला जातो. यंदा मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मागील दोन वर्ष कोरोनाविषाणू चे संक्रमण असल्याने गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले होते. परंतु यंदा शासनाने परवानगी दिल्याने बिमा संकुलामध्ये भव्य दिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावेळीसुद्धा मंडळाच्यावतीने जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बिमा संकुलात जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


फोटो - खा. श्रीरंग बारणे यांनी घेतले गणेशाचे दर्शन
Comments