लाईफ लाईन हॉस्पिटलचे डायरेक्टर पराग उत्तमराव बेडसे यांची साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड..
 अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड

पनवेल दि.१० (वार्ताहर) : शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटल चे डायरेक्टर पराग उत्तमराव बेडसे यांची साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी, साक्री जि. धुळे या नामांकित संस्थेच्या अध्यक्ष पदी बिनविरोध फेरनिवड झाली. तसेच सेक्रेटरी पदी अनिल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.
साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी साक्री ही संस्था १९४० साली स्थापन झाली असून संस्था गेल्या ८२ वर्षापासून धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात तसेच औरंगाबाद येथे बहुजन समाजाच्या, दलित-आदिवासींच्या, कष्टक-यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणेसाठी विद्यार्थी हाच केंद्र बिंदू मानून संस्थेचे कामकाज चाचले आहे. संस्थेची ६ माध्यमिक विद्यालये, ३ कनिष्ठ महाविद्यालये, ग्रामीण मागास आदिवासी मुला-मुलींसाठी ७ वसतीगृहे, भटक्या विमुक्त मुला-मुलींसाठी आश्रमशाळा, कृषि तंत्र निकेतन, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, चित्रकला महाविद्यालय, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, बाल मंदिरे, सीबीएसई स्कूल, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र अशा एकूण ३५ विद्याशाखा आहेत. या विद्याशाखांमध्ये एकूण १०००० विद्यार्थी शिक्षण घेत असून ५०० कर्मचारी सेवेत आहेत. अनेक शाखांचे रौप्य महोत्सव, सुवर्ण, हीरक महोत्सव समारंभ विविध शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमातून साजरे करण्यात आले आहेत. संस्था अमृत महोत्सवाकडून शताब्दीकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेवून अनेक पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित करण्यात आले आहेत. 
फोटो : लाईफ लाईन हॉस्पिटल चे डायरेक्टर पराग उत्तमराव बेडसे यांची साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड
Comments