नागरी प्रश्नावरून खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन सिडकोविरोधात आक्रमक ...
 सिडकोविरोधात आक्रमक ...

पनवेल दि.१३ (वार्ताहर) : खारघर-तळोजा परिसरातील नागरी प्रश्नावरून खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन सिडकोविरोधात आक्रमक झाले असून तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  
खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन च्या संघाने खारघर सिडको चे अधिकारी गिरीश रघुवंशी यांची भेट घेऊन खारघर सेक्टर 26, 35 मध्ये महानगर गॅसने केलेल्या रस्त्यांच्या खोदकामाबाबत जाब विचारला असून सदर रस्त्यांची दुरुस्ती करून त्वरित रस्ता पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावर सिडको त्वरित काम करेल असे आश्वासन सिडकोचे अधिकारी गिरीश रघुवंशी व मंगेश गोंधळी यांनी वेल्फेअर असोसिएशनच्या संघाला दिले. 
यावेळी खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या संघाचे मंगेश रानवडे, गिरीश दिवेकर, इम्रान काझी, सौ ज्योती नाडकर्णी उपस्थित होते.


फोटो : सिडको अधिकाऱ्यांना निवेदन देताना खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image