मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात ..
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : मोटारसायकल चोरून ती पळवून नेणाऱ्या दोघं जणांना नागरिकांनी पकडून तळोजा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
तालुक्यातील पिसार्वेमधील रहिवासी स्वप्निल म्हात्रे यांनी त्यांची मोटारसायकल घराच्या कंपाउंड बाहेर उभी केली होती. सायंकाळी मोटारसायकल न दिसल्यामुळे स्वप्निल याने एका सहकाऱ्यासोबत पेट्रोल पंपाच्या दिशेने चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना पनवेल-मुंब्रा हायवेजवळ दोन जण मोटारसायकल पळवून नेत असताना दिसले. यावेळी म्हात्रे यांनी चोरट्यांचा पाठलाग करुन त्या दोन्ही चोरांना पकडून तळोजा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तळोजा पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.