वडघर परिसरत आनंदाची शिधा सर्वसामान्यांच्या दारी...

पोलीस पाटील, माजी सरपंच, जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत शुभारंभ

पनवेल/प्रतिनिधी -- आनंदाची शिधा सर्वसामान्यांच्या दारी दिवाळी निमित्त राज्य शासनाने गोरगरीब जनतेसाठी सुरु केली आहे. वडघर ग्रामपंचायत हद्दीतील वडघर, चिंचपाडा, वाघिवली भागात सोमवारी दिनांक 31 रोजी वडघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविकांत भोपी, पोलीस पाटील कुणाल लोंढे, जेष्ठ नागरिक दामोदर पाटील यांच्यासह नागरिक, ग्रामस्थ, महिला मंडळ यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

दिवाळीची मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचबरोबर  घराघरात फराळही केला होता. राज्य सरकारने गोर-गरिबांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 100 रुपयात रेशन कीट देणार असल्याची घोषणा केली होती. या योजनेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला आहे. वडघर गावात या योजनेचा शुभारंभ झाल्याने सर्व सामन्यांना "आनंदाची शिधा" अल्प दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. सर्व सामान्यांना देण्यात येणाऱ्या आनंदाची शिधा या मधील सर्व साहित्याची उपस्तितीतांनी पाहणी केली. यावेळी सुशांत पाटील यांनी माहिती दिली. या योजनेद्वारे वडघर, चिंचपाडा व वाघिवली येथील सुमारे 970 लाभार्थीना लाभ घेता येणार आहे. यावेळी पोलीस पाटील कुणाल लोंढे, माजी सरपंच रविकांत भोपी यांनी शासनाच्या योजनेचे माहिती दिली व लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
Comments