'सर्जनशीलतेचा नवाविष्कार' दिवाळी अंक प्रकाशन सोहळा व निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न..
 निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न 

पनवेल - जाई फाउंडेशन द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई द्वारा आयोजित 
'सर्जनशीलतेचा नवाविष्कार' दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा व निमंत्रितांचे कविसंमेलन नविन पनवेल येथे संपन्न झाले. 
     या  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.एल.बी.पाटील(रायगड भुषण) तर उद्घाटक म्हणून प्रदीप म्हापसेकर (सुप्रसिद्ध लेखक व चित्रकार), कार्याध्यक्ष डॉ.वर्षा रणदिवे(मुख्य संपादक सर्जनशीलतेचा नवाविष्कार) उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थिती अंजली ढमाळ (राज्यकर उपायुक्त) तर  मार्गदर्शक म्हणून प्रतिभा सराफ (ज्येष्ठ साहित्यिक) मा.पुष्पराज गावंडे (युवा कादंबरीकार तथा सदस्य महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ) तर प्रमुख अतिथी म्हणून.गणेश कोळी, जेष्ठ पत्रकार व  कोमसाप केंद्रिय कार्यकारिणी रायगड जिल्हा रमेश भोळे   जेष्ठ पत्रकार
यांच्या उपस्थितीत पार पडले.
         प्रकाशन सोहळ्यानंतर दोन सत्रामध्ये निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या कविसंमेलनाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विजय बिंदोड, तर प्रमुख अतिथी म्हणून  जितेंद्र लाड,माणिकराव गोडसे व जयश्री चौधरी उपस्थित होते. 
    मंदाकिनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून अशोक उघडे,संजिवनी राजगुरू,
राजेंद्र राठोड उपस्थित होते. राज्यभरातुन जवळपास सत्तर कवी या कविसंमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलेले होते. एकापेक्षा एक दर्जेदार कवींनी रचना सादर करून काव्यसंमेलनाची रंगत वाढवली. उत्तरोत्तर कवी संमेलन रंगत गेले,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शब्दवेल साहित्य मंचचे अध्यक्ष प्रविण बोपुलकर, सचिव अश्विनी अतकरे,उपाध्यक्षा रंजना कराळे,उपाध्यक्षा शितल राऊत,व्यवस्थापक नरेंद्र लोणकर,प्रमुख कार्यवाह प्रविण सोनोने,मुख्य कार्यकारिणी सदस्य रामदासजी गायधने, आबासाहेब कडू व रायगड जिल्हा कार्यकारिणीतर्फे शब्दवेल रायगड  जिल्हाध्यक्ष देवेंद्रइंगळकर,रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विलास पुंडले,उपाध्यक्षा योगिनी वैदू यांनी परिश्रम घेतले शेवटी रामदास गायधने यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments