झोपेत असलेल्या माणसावर अज्ञात इसमाचा हल्ला ...
झोपेत असलेल्या माणसावर अज्ञात इसमाचा  हल्ला ...

पनवेल /  दि . २१ ( संजय कदम ) : दारूच्या नशेत झोपेत असलेल्या माणसावर अज्ञात इसमाने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना पळस्पे ब्रिज परिसरात घडली आहे . 
          स्वप्निल सहस्त्रबुद्धे  ( वय २८ ) हे पळस्पे ब्रिज खाली दारूच्या नशेत झोपले असता कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात शस्त्रांच्या साहाय्याने त्यांच्या हातावर पायावर मारून त्याला जखमी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments