तरुणी बेपत्ता ..
पनवेल दि.११ (वार्ताहर) : तालुक्यातील दापोली पारगाव येथील एक तरुणी किराणा दुकानातून साहित्य घेवून येते असे सांगून ती राहत्या घरातून कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
सिमा रामेश्वर राठोड (वय १९ वर्षे, रा. दापोली पारगाव) असे या तरुणीचे नाव असून तिचा रंग सावळा, उंची ५ फुट २ इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, नाक. पसरट, केस काळे वाढलेले कुरळे, अंगात नेसूस पंजाबी ड्रेस, काळया रंगाचा टॉप, सोनेरी कलरची पॅन्ट, पायात लाल कलरची सॅन्डल घातलेली आहे. तसेच सोबत काळया रंगाची स्कूल बॅग आहे. तरी या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक अनिल राजुरे यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो : बेपत्ता सिमा राठोड