गळफास घेऊन इसमाची आत्महत्या..
गळफास घेऊन इसमाची आत्महत्या..

पनवेल / दि.१३ (वार्ताहर) : मानसिक तणावाखाली येऊन एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरढोण येथील श्री बालाजी हॉटेल आणि लॉज येथे घडली आहे. 
दीपक कटबू (वय ४०, रा. मुंब्रा) याने मानसिक तणावातून श्री बालाजी हॉटेल आणि लॉज मधील रूम नं १०४ येथे पंख्याला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments