विस्टा फूड्स प्रोसेस प्रा.ली.चा तळोजा औद्योगिक वसाहतीतील इतर कारखानदारांना आदर्श - तालुका प्रमुख विश्‍वास पेटकर..
 तालुका प्रमुख विश्‍वास पेटकर

पनवेल, / दि.20 (संजय कदम) ः तळोजा औद्योगिक वसाहती मधील विस्टा फूड्स प्रोसेस कंपनीमध्ये कंपनीचे सल्लागार चंद्रशेखर सोमण याच्या अध्यक्षतेखाली 25 शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली आहे ते कार्य अत्यंत कौतुकास्पद असून याचा आदर्श इतर कारखानदारांनी सुद्धा घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर यांनी याप्रसंगी केले आहे.
पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातील जिल्हा परिषदेच्या जवळपास 25 शाळांमध्ये या कंपनीने त्यांच्या सी एस आर फंडामधून जिल्हा परिषदेच्या शाळेत कोणत्या शैक्षणिक साहित्य बाबींची गरज आहे, त्यासाठी आपणास काय पाहिजे याची सोमण यांनी मुख्याध्यापकांना विचारणा करून  एक आगळा वेगळा कार्यक्रम केला, यावेळी विचाराची देवाणघेवाण होऊन समाजमध्ये एक चांगला मेसेज गेला. करोनाच्या दोनवर्षाच्या कालावधीमध्ये, व पनवेल महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या मध्ये शाळेचा वर्गीकरणाचा वाद,व त्यामुळे दुर्लक्ष झालेल्या रायगडजिल्हा परिषदेच्या शाळा,यासाठी तालुका प्रमुख विश्‍वास पेटकर यांनी  सतत दोन वर्ष पाठपुरावा करून पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती,
या बैठकीला विस्टा कंपनीचे सल्लागार चंद्रशेखर सोमण, मॅनेजर सौ आगलावे, प्रवीण ठाकूर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्यध्यापकांची बाजू समजावून घेऊन नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक साहित्य फंडामधून मंजूर करून वाटप करू असे सांगितले. यावेळी पनवेल पंचायत समितीचे कनिष्ट अभियंता मटकर, उपतालुकाप्रमुख बबन फडके, उपतालुकाप्रमुख शांताराम कुंभारकर, युवासेना अधिकारी जीवन पाटील, शाखाप्रमुख सुधीर फडके आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील जवळपास 22 जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होता. या सर्वांचे आभार शिक्षकांचे नेते, मुख्यध्यापक भोपी गुरुजी, व खैरे मॅडम यांनी मानले.
फोटो ः विस्टा फूड आयोजित बैठक
Comments