नागरीकांचे सक्षमीकरण आणि अधिकाराविषयक माहिती करीता पनवेल तालुका विधी सेवा समितीच्यावतीने बाईक रॅली...
विधी सेवा समितीच्यावतीने बाईक रॅली. 
पनवेल दि.०९ (संजय कदम): नागरीकांचे सक्षमीकरण आणि अधिकाराविषयक माहिती करीता पनवेल मध्ये पनवेल तालुका विधी सेवा समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीची सुरुवात पनवेल मधील जिल्हा व सत्र न्यायालय पनवेल, रायगड येथून सुरुवात झाली.
                  या रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सकल भारत कायदेविषयक जनजागृती अभियाना अंतर्गत पनवेल तालुका विधी सेवा समितीच्यावतीने ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यापार्श्वभुमीवर समितीच्यावतीने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरीकांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या अधिकारा विषयक माहिती व्हावी या करीता बुधवारी बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ह्या रॅलीला पनवेल मधील जिल्हा व सत्र न्यायालय पनवेल, रायगड येथून सुरुवात झाली असून संपुर्ण पनवेल परिसरात फिरवण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायाधिश-१ जे. डी.वडणे, जिल्हा न्यायाधिश, पनवेल आस. एस. भाकरे, न्याय दंडाधिकारी वर्ग १ पनवेल इंदलकर, न्याय दंडाधिकारी वर्ग -१ पांडे, न्याय दंडाधिकारी वर्ग -१ सोनवलकर, न्याय दंडाधिकारी वर्ग -१ वाघमारे तसेच पनवेल वार संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ, वार संघटनेचे सदस्य अॅडव्होकेट धनराज तोकडे, अॅडव्होकेट विशाल डोंगरे, अॅडव्होकेट भुषण पाटील, अॅडव्होकेट अमर पटवर्धन, अॅडव्होकेट मनोज म्हात्रे, अॅडव्होकेट विशाल मुंडकर, अॅडव्होकेट इंद्रजीत भोसले, अॅडव्होकेट ज्योती उरणकर, अॅडव्होकेट चंद्रकांत मढवी, अॅडव्होकेट इरशाद शेख, अॅडव्होकेट मनोहर सचदेव, ऍड मनीषा गायकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


फोटो: पनवेल तालुका विधी सेवा समितीच्यावतीने काढण्यात बाईक रॅली..
Comments