स्टील मार्केटमध्ये सुविधांसाठी आंदोलन ; रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक बाजार समितीला घेरणार..
 आंदोलक बाजार समितीला घेरणार
पनवेल / दि.२४(वार्ताहर): आशिया खंडातील क्रमांक एक चे कळंबोली स्टील मार्केट समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने शुक्रवारी 25 नोव्हेंबर रोजी आंदोलन पुकारले आहे. या निमित्ताने एक दिवसीय लाक्षणिक बंदचे  आवाहन पक्षाचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केले आहे. यामध्ये व्यापारी, वाहतूकदार, माथाडी कामगार तसेच इतर सर्वजण सहभागी होणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
             कळंबोली स्टील मार्केटमध्ये सुविधांचा वाणवा आहे. रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट, पावसाळी गटारे याशिवाय धुळीचे साम्राज्य अशा अनेक समस्यांच्या चक्रव्यूहामध्ये मार्केट अडकले आहे. त्याचा त्रास व्यापारी, वाहतूकदार, माथाडी कामगार त्याचबरोबर इतर सर्वांना होत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने बाजार समितीला याबाबत 25 नोव्हेंबर चे अल्टिमेटम दिले होते. परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून बाजार समितीमधील मूलभूत सुविधांच्या न्याय हक्कासाठी गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या एक दिवसाच्या लाक्षणिक बंद आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केले आहे.
फोटो : रामदास शेवाळे
Comments