खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल वैभव / दि. १७ ( संजय कदम ) : कळंबोली वसाहतीमध्ये ठिकठिकाणी पडलेल्या रस्तावरील मोठमोठ्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी कळंबोली शिवसेनेच्या वतीने पनवेल महानगर पालिका शहर अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
शिवसेना कळंबोली विभाग प्रमुख महेश गुरव ,नरेंद्र सिंग होठी व सविंदर सिंग भीडर यांनी पनवेल महानगर पालिका शहर अभियंता यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की , कळंबोली शहरामध्ये मोठया रस्त्याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. ठिकठिकाणी मोठे मोठे खडडे पडले आहेत त्यामुळे वाहनचालकांना मोठया प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच छोटे मोठे अपघात सातत्याने घडत आहेत. तरी डी मार्ट नाका ते रोडपाली तलावापर्यंत मोठया प्रमाणात रस्ता खराब झालेला आहे तरी रस्ता त्वरीत दुरुस्त करणे आवश्यक आहे समजा तसे न झाल्यास आपणांस जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची आपण नोंद घ्यावी. तरी योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे . त्याच प्रमाणे डी मार्ट ते रोडपाली सेक्टर 20 येथील प्रथम चौका चौकातले खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे .
फोटो - पनवेल महानगर पालिका शहर अभियंता यांना निवेदन देताना शिवसेना कळंबोली विभाग प्रमुख महेश गुरव ,नरेंद्र सिंग होठी व सविंदर सिंग भीडर आदी