प्लबिंगचे काम मिळवुन देण्याच्या बहाण्याने ९६ लाखांची फसवणूक ...
प्लबिंगचे काम मिळवुन देण्याच्या बहाण्याने ९६ लाखांची फसवणूक ...


पनवेल दि. ०६ ( वार्ताहर )  : प्लबिंगचे काम मिळवुन देण्याच्या बहाण्याने एका भामटयाने खारघर सेक्टर - २७ भागात राहणाऱ्या एका प्लंबरकडुन त्याची कागदपत्रे घेऊन त्यावर आपला फोटो लावुन तयार केलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँका व वित्तीय संस्थांकडुन तब्बल ९६ लाखांचे कर्ज काढल्याचे उघडकीस आले आहे. सचिन बिल्लूर असे या भामटयाचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. 
                           या प्रकरणात फसवणुक झालेला नितीशकुमार प्रजापती (२७) हा खारघर सेक्टर- २७ मधील रांजणपाडा येथे कुटुंबासह राहण्यास असून तो प्लंबिंगचे काम करतो. तर त्याची फसवणुक करणारा आरोपी सचिन बिल्लर हा खारघर सेक्टर-१८ मध्ये राहतो. जुन २०२० मध्ये नितीशकुमार आणि सचिन बिल्लुर या दोघांची कामानिमित्त भेट झाली होती. या ओळखीनंतर सचिन बिल्लुर याने नितीशकुमार सोबत फोन वरुन संपर्क ठेवत त्याला प्लंबिंगचे काम मिळवुन देण्याचे अमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने त्याच्याकडुन आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स व इतर कागदपत्रे मागुन घेतली होती. काम मिळेल या आशेने नितीशकुमार याने मार्च २०२१ मध्ये आपली कागदपत्रे सचिनच्या व्हॉट्सऍपवर पाठवुन दिली होती.त्यावेळी आरोपी सचिन बिल्लुर याने सदर कागदपत्रांचा गैरवापर करत नितीशकुमारच्या आधारकार्ड व पॅनकार्डवर स्वतःचा फोटो लावुन बनावट आधारकार्ड व पॅन कार्ड तयार केले. त्यानंतर त्याने त्याच कागदपत्रांचा वापर करुन ७ वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांकडुन लाखो रुपयांचे कर्ज काढले. मार्च २०२२ मध्ये डीसीबी बँकेने नीतीशकुमारला संपर्क साधुन त्याच्या नावावर कर्ज असल्याची माहिती दिल्यानंतर नितीशकुमारने त्याबाबत अधिक चौकशी केली. त्यानंतर सचिन बिल्लूर याने त्याच्या कागदपत्रांवरुन बनावट कागदपत्र तयार करुन त्याच्या नावावर ७ वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांकडुन तब्बल ९६ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे नितीशकुमार याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सचिन बिल्लुर याच्या विरोधात तक्रार दाखल केली.या प्रकरणात फसवणुक झालेल्या नितीशकुमार याच्या नावाने ज्या बँकेतुन कर्ज घेण्यात आले, त्या बँकेत जाऊन नितीशकुमार याने जाऊन खाते उघडताना देण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर सचिन बिल्लुर याने काम मिळवुन देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडुन घेतलेल्या कागदपत्रांवर त्याचप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्डवर नितीशकुमारच्या फोटो ऐवजी स्वत:चेफोटो लावुन बनावट कागदपत्र तयार केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने त्याच कागदपत्रांचा गैरवापर करुन ७ बँका व वित्तीय संस्थांकडुन तब्बल ९६ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे आढळुन आले आहे.
Comments