त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून रामेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा...
त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून रामेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा...

पनवेल : दि, ८ (अनिल कुरघोडे) : -
त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून पनवेल नगरीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात दि.७ रोजी सोमवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संपूर्ण परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला.

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते, या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरी वात अर्थात दिव्यांची वात लावली जाते,  हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो, हिंदु धर्मात अनन्य साधारण महत्त्व असलेली कार्तिक पौर्णिमा आहे या दिवशी गंगेत स्नान करण्याने मोठे पुण्य मिळते अशी भावना आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दिपोत्सवही साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराने अखंड भूमीवरून जनतेला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाचे तीन पुत्रांचा वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात, त्याचेच औचित्य साधून  रामेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकरापुढे आरती व त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करण्यात आला, याचे आयोजन उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा मंदिराचे अध्यक्ष उमेश इनामदार आणि जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.नगरसेवक नितीन पाटील यांनी केले होते.

यावेळी भाजपा मा.नगरसेवक, सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सोशल मीडियाचे प्रसाद हनुमंते, पो.उपायुक्त शिवराज पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी धोटे, दिनेश बागुल, तसेच मंदिराचे विश्वस्त, कार्यकर्ते व भाविकगण उपस्थित होते.
Comments