राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत रायगड काँग्रेसचा डंका..

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा राहुल गांधींबरोबर संवाद..


             

पनवेल / प्रतिनिधी : - राष्ट्रीय कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात नांदेड येथे दाखल झाल्यापासून रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत हे त्यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. दि. १७ नोव्हेंबर रोजी वाडेगाव ता. अकोला येथे महेंद्र घरत यांना राहुल गांधी यांच्या सोबत ७ मिनिटे संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोलेही सोबत होते. स्व. बॅ. अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्याची जबाबदारी महेंद्र घरत यांच्यावर दिली आहे असे नानाभाऊ पटोलेंनी राहुल गांधी यांना सांगितले. तसेच महेंद्र घरत यांनी रायगड कॉंग्रेसला नवसंजीवनी दिल्याचे नानाभाऊ पटोलेंनी राहुल गांधी यांना सांगितले.

            रायगड जिल्हा कॉंग्रेस तर्फे वाडेगाव ता. अकोला येथे दि. १७ नोव्हेंबर रोजी पदयात्रेच्या मार्गावर कोळी नृत्याचे सादरीकर करण्यात आले. राहुल गांधी यांनी याची दखल घेत कलाकारांना स्वतः हात करून जवळ बोलावून घेतले. यावेळी रायगड कॉंग्रेस तर्फे कोळी समाजाचे प्रतिक मच्छीमार बोट राहुल गांधी यांना भेट देण्यात आली. त्यांनी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला. रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासोबत जिल्ह्यातील जवळपास दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी कोळी नृत्याने पदयात्रा दणाणून सोडली. पदयात्रेत रायगड जिल्ह्याचाच बोलबाला होता. जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अकोला येथील पदयात्रेच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.   

Comments