ट्रेलरला बोलेरोची धडक ; एक ठार...
ट्रेलरला बोलेरोची धडक ; एक ठार...


पनवेल दि. १२ ( वार्ताहर )  : सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी बोलेरो पिकअप जिप धडकल्याचा प्रकार मध्यरात्री कळंबोली सर्कल येथे घडला. या अपघातात बोलेरो जीपमधील एक व्यक्ती ठार झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. खांदेश्वर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.                        मृत सिकंदर बिलाशी बैठा (४५ ) आणि चालक बिरेंदर यादव (३०) दोघेही मुंबईत राहणारे आहेत. पनवेल येथून मुंबईच्या दिशेने रात्री जात होते. कळंबोली सर्कल जवळील सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठीमागून बोलेरो धडकली. यामध्ये बोलेरोतील दोघेही गंभीर जखमी झाले. एमजीएम रुग्णालयात दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रक्तस्राव झाल्याने सिकंदर बैठा यांचा मृत्यू झाला. बोलेरो सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर स्वतःहून धडकल्याने अपघात झाल्याचे आढळले आहे.
Comments