सामान्य नागरिकांसाठी क्रीडांगण विकसित करण्याची शिंदे गटाचे महानगर संघटक मंगेश रानवडे यांची आयुक्त गणेश देशमुख यांच्या कडे मागणी ..
 आयुक्त गणेश देशमुख यांच्या कडे मागणी 

पनवेल दि. ०९ ( वार्ताहर ) : खारघर वसाहत परिसरात सामान्य नागरिकांसाठी क्रीडांगण विकसित करण्याची  शिंदे गटाचे महानगर संघटक मंगेश रानवडे यांची आयुक्त गणेश देशमुख यांच्या कडे निवेदना मार्फत मागणी करण्यात आली आहे . 
                    आयुक्त गणेश देशमुख यांची शिंदे गटाचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे,महानगर संघटक मंगेश रानवडे , खारघर शहर संघटक  इम्तियाज शेख, मुनाफ अमिराली,  झोयेब शेख आदींनी भेट घेतली त्यावेळी महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी सांगितले की , खारघर सेक्टर 35 एच मधील प्लॉट नंबर एक, सिडकोच्या मास्टर प्लॅन प्रमाणे, ओपन स्पेस व  खेळण्याकरिता आरक्षित घोषित केला  गेला आहे.नुकताच हा प्लॉट सिडकोने  पनवेल महानगरपालिका प्रशासनाला हस्तांतरितही केला गेला आहे.ह्याच पार्श्वभूमीवर, आपल्याला व आपल्या मुलांना खेळण्याकरिता तथा विरंगुळा मिळण्याठी एक उत्तम क्रीडांगण मिळेल या आशेने  नागरिकांनी या प्लॉट सभोवताली वसलेल्या अनेक ग्रह संकुलामध्ये सदनिका विकत घेतल्या.मात्र जेव्हा -जेव्हा नागरिक अथवा लहान मुले इकडे खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा-तेव्हा स्थानिक मंडळी त्यांना शिवीगाळ करून, दमदाटी करून, खेळण्यासाठी वापरण्यास मज्जाव करत  असल्याने, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. इतकेच थांबले नाही तर पनवेल महानगरपालिकांनी लावलेला आपल्या मालकी हक्काचा  बोर्ड ही ह्या प्लॉट वरून रातोरात गायब केला गेला आहे या गोष्टीची गंभीर दखल घेत शिंदे गटाचे, खारघर शहर संघटक  इम्तियाज शेख यांनी महानगर संघटक क्षेत्र पनवेल  मंगेश रानवडे यांच्या निदर्शनास ही बाब आणली. खारघर सेक्टर 35 च्या नजीकच्या परिसरात सिडकोने आंतरराष्ट्रीय पातळीचे, फुटबॉल व हॉकी क्रीडांगण विकसित जरी केले असले तरी सामान्य नागरिकांसाठी एकही क्रीडांगण विकसित न केल्याने, येथील परिसरात राहणारे रहिवासी अत्यंत नाराज आहेत. बाळासाहेबांची शिवसेना, या पक्षाचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे  यांनी  पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना याबाबत पूर्ण माहिती व सखोल चर्चाही केली. या चर्चा बैठक मध्ये मंगेश रानडे व इम्तियाज शेख, मुनाफ अमिराली, झोयेब शेख उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेने या जागी आपला मालकीचा बोर्ड लावून, व येथील नागरिकांना या प्लॉटमध्ये क्रीडांगण म्हणून वापरण्याची लवकरात लवकर देण्याचे मागणी शिंदे गटाने निवेदन पत्र मार्फत केली आहे.यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत चौकशी करून पुढची कारवाही लवकरात लवकर करण्याची ग्वाही  दिली.


फोटो - आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देतांना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे,महानगर संघटक मंगेश रानवडे , खारघर शहर संघटक  इम्तियाज शेख, मुनाफ अमिराली,  झोयेब शेख आदीं
Comments