नेरे ग्रामपंचायतीत भाजपच्या वतीने तरुणांची फौज मैदानात ; प्रकाश घाडगे यांच्यासह ११ उमेदवारांकडून मतदारांच्या भेटी-गाठी...
 उमेदवारांकडून मतदारांच्या भेटी-गाठी...

नवीन पनवेल : नेरे ग्रामपंचायतीमध्ये भाजप, मनसे, शिवसेना शिंदे गट, आरपीआय युतीचे प्रकाश घाडगे हे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. विशेष म्हणजे अतिशय चुरशीची लढत असलेल्या नेरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे भाजप मनसेच्या उमेदवारांकडे दिवसेंदिवस तरुणांचा कल वाढत दिसत असल्याने विजयाचा गुलाल भाजपचाच उडविणार असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
               सरपंच निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने नेरे ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या या निवडणुकीत युवकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. गावावर राजकीय वर्चस्व कोणाचे? यासाठी गावस्तरावर युवकांची चाचपणी सुरू आहे. ग्रामपंचायतींसाठी येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानुसार नेरे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, अरूणशेठ भगत, संजय पाटील यांच्या माध्यमातून भाजपा मनसेच्या उमेदवारांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. नेरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश घाडगे हे थेट सरपंच पदाचे उमेदवार आहेत. त्यानुसार भाजप मनसेच्या प्रमुख नेत्यांकडून सरपंच पदाचे उमेदवार प्रकाश घाडगे हे उमेदवारांना मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी तरुणांची फौज मैदानात उतरली आहे. त्यानुसार प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आता घरोघरी जाऊन मतदाराच्या भेटी-गाठी घेण्याचे सुरु असून मतदारांकडून भाजप मनसेच्या विजयाचा गुलाल उधळणार असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.
         आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर मी आणि आमचे सगळे सदस्य भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्‍वास थेट सरपंच पदाचे उमेदवार प्रकाश घाडगे यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश घाडगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…! अशा घोषणांनी नेरे, नेरेपाडा, टेमघरचा परिसर दुमदुमून जात आहे. भाजप, आरपीआय, शिवसेना शिंदे गट, मनसे युतीचे कार्यकर्ते झेंडे, मफलर, होर्डिंग घेऊन मोठ्या संख्येने प्रचार फेरीमध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे माता भगिनींच्या रूपात महिला शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरून प्रचार करताना दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील विलक्षण आहे. एकंदरीतच समाजातील विविध गटातील, विविध धर्मातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्रकाश घाडगे यांना मिळत आहे. त्यामुळे भाजपचे प्रकाश घाडगे हे निवडून येणार हे नक्की आहे.
Comments