दोन अनोळखी इसमांनी केली वृद्ध महिलेची फसवणूक ; लाखो रुपये किमतीचे दागिने केले लंपास...
लाखो रुपये किमतीचे दागिने केले लंपास..


पनवेल / दि.२७ (संजय कदम) : एका वृद्ध महिलेची फसवणूक करून लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील मिरची गल्लीच्या नाक्याजवळ घडली आहे. 
श्रीमती कोलानजी कारुप्पण करथान (वय ६२, रा. तक्का) या पनवेल येथील गणेश मार्केट येथे बांगड्या घेण्यासाठी गेल्या असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना अंगावरील सोने कोणीतरी चोरून नेईल असे सांगून त्यांचे सोने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. सदर पिशवी खाली ठेवली असता त्या दोन अनोळखी इसमांनी त्यांची नजर चुकवून जवळपास १ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याची दागिन्यांची पिशवी घेऊन ते पसार झाले. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments