काशी येथे मूळ वैश्य कुलगुरू मठाच्या पुनर्निर्माणसाठी शांकर एकात्मता पदयात्रा..

कळंबोलीत करण्यात आले भव्य स्वागत..


 पनवेल : -

वैश्य गुरू श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींनी कर्नाटकातील कालडी ते काशी (वाराणशी) पर्यंत शांकर एकात्मता पदयात्रेचे नियोजन केले आहे. पदयात्रेच्या निमित्ताने त्यांचे रायगड जिल्ह्यात आठवडाभर वास्तव्य होते. त्यांच्या या पदयात्रेत कोंकणसह रायगड जिल्ह्यातील असंख्य भाविक सहभागी होत आहेत. या पदयात्रेला त्यांनी कर्नाटक कालडीहून विजयादशमीच्या दिवशी (५ सप्टेंबर) प्रारंभ केला असूनते अक्षय तृतीया (२३ एप्रिल) ला काशी येथे पोहोचणार आहेत. सर्वांनी या महान कार्यात सहभागी होऊन तन-मन-धनाने सेवा अर्पण करावीअसे स्पष्ट प्रतिपादन वामनाश्रम महास्वामींनी केले आहे. २६ डिसेंबर आणि २७ डिसेंबर रोजी वामनाश्रम महास्वामींचे कळंबोली येथे स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक वैश्य बांधव उपस्थित होते. वामन आश्रम स्वामींनी संपूर्ण वैश्य समाजाचे गत पूर्ववैभव पुन्हा आणण्याच्या उद्देशाने महापुण्यक्षेत्र काशी येथे मूळ वैश्य गुरुमठ पुनर्निर्माणचा महा संकल्प केलेला आहे.

            रायगड जिल्ह्यात या पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कळंबोली येथे वामनाश्रम महास्वामींनी प्रत्येक ठिकाणी वास्तव्यात असताना प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून चंद्रमौळी देवतांची पूजा आणि अन्य धार्मिक कार्यक्रम झाले. याप्रसंगी असंख्य भाविकभक्तांची उपस्थिती होती. संपूर्ण वैश्य समाज केरळकर्नाटकगोवामहाराष्ट्र इत्यादी राज्यात पसरलेला आहे. या समाजाचा कुलगुरू मठ हळदीपूर येथे आहे. या मठात अनेक कार्यांना एक-एक करून रुवात झाली आहे. त्यानंतर सुमारे एकशे दहा वर्षे खंडित झालेली गुरुपरंपरा आरंभ करण्यासाठी श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींचा योग्य गुरू बटू म्हणून शोध झाल्यावर १९९३ ते २००४ पर्यंत त्यांना शृंगेरी जगद्गुरू श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजींच्या सानिध्यात धार्मिक व आध्यात्मिक शिक्षण प्राप्त झाले व त्यांच्याच कृपाशीर्वादाने २००४ साली हळदीपूर गुरुमठात गुरुपट्टाअभिषेकाने गुरुपरंपरा पुन्हा सुरू झाली व मठाचे सर्व कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने पुन्हा सुरू झाले. मठात दर वर्षी ब्रहारथोत्सव थाटात संपन्न होतो.

           कालडीपासून काशीपर्यंत सुरू केलेली पदयात्रा फार महान व कठीण काम आहेअसे अनेक जणांचे मत होते. असे असताना प्रतिसादरुपात काशी येथे मोठी जागा घेऊन मूळ गुरूमठ निर्माण करणे हे मोठे कठीण कार्य आहेपण हे कार्य करण्याचा संकल्प केला असूनपदयात्रा सुरू केली. कळंबोलीत या पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. पुढे ही पदयात्रा ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

Comments