करंजाडेमध्ये महाविकास आघाडीचा प्रचाराचा धडाका...

रामेश्‍वर आंग्रे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
पनवेल दि. १२ ( वार्ताहर ) :  करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच रामेश्‍वर बबन आंग्रे हे पुन्हा एकदा थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीतर्फे तर्फे करंजाडे येथे शेकाप, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित व बहुजन आघाडी अशा मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीने प्रचार फेरीचे आयोजन केले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड उत्साह या प्रचार फेरीमध्ये दिसून आला.
                        यावेळी शेकाप पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अनुराधा ठोकळ आदींच्या प्रमुख उपस्थित प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थियांना संबोधित करताना गणेश कडू म्हणाले की रामेश्‍वर आंग्रे आणि त्यांच्या सर्वच सदस्यांनी भरभरून विकास कामे केली आहेत. आपल्या कार्यकालाच्या अखेरच्या दिवसापर्यंत अगदी विरोधकांची सुद्धा विकास कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमचे सगळे सदस्य आणि रामेश्‍वर आंग्रे भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह निवडणुकीमध्ये बँकेवर आर्थिक ताण येऊ नये या प्रामाणिक उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीकडे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. जनभावनेचा आदर न करता विरोधकांनी बँकेच्या माथी ही निवडणूक मारली. महाविकास आघाडीला मतदारांनी भरभरून मतदान केले आणि विरोधकांच्या चारी मुंड्या चित करत त्यांना आम्ही आस्मान दाखवले. येणार्‍या काळात आगामी सगळ्या निवडणुकांच्यात हेच चित्र पाहायला मिळेल, असा विश्‍वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. रामेश्‍वर आंग्रे आणि त्यांच्या तमाम सदस्यांना मी विजयी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले. 

चार झेंडे घेऊ हाती, करंजाडेच्या विकासासाठी

महाविकास आघाडीचा विजय असो!! रामेश्‍वर आंग्रे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…! अशा घोषणांनी करंजाडेचा परिसर दुमदुमून गेला होता. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि बहुजन आघाडी आशा मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते झेंडे, मफलर, होर्डिंग घेऊन मोठ्या संख्येने प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे माता भगिनींच्या रूपात महिला शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरून महाविकास आघाडीचा प्रचार करताना दिसून येत होती. ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील विलक्षण होता. एकंदरीतच समाजातील विविध गटातील, विविध धर्मातील नागरिक उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार

रामेश्‍वर आंग्रे – थेट सरपंचपदाचे उमेदवार
प्रभाग 1 – अंजना शिवाजी कातकरी, योगेंद्र दत्ताराम कैकाडी

प्रभाग 2 – अक्षय मोहन गायकवाड, उमेश शंकर भोईर , कोमल रवी खिलारे, प्रभाग

प्रभाग 3 – श्रुती निलेश गायकवाड , नीता योगेश राणे, रुपेश बबन आंग्रे

प्रभाग 4 – कल्पना विनेश गायकर, नीलम मोहन भगत, ध्रुव रामचंद्र बोरकर

फोटो  - महाविकास आघाडीचा प्रचार
Comments