कळंबोलीतील शेकडो जणांनी केला शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पक्ष प्रवेश..
(उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पक्ष प्रवेश..

पनवेल / प्रतिनिधी -  : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथील शेकडो पुरुषांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कळंबोली शहर प्रमुख सुर्यकांत म्हसकर यांच्या विशेष प्रयत्नाने गोकुळ चौधरी, भास्कर झिंजाड, रामदास उजगरे, रामदास भाडळे, संदीप झिंजाड, संपत पोखरकर, संजय चौधरी दत्तात्रय दगडु भाडळे यांच्यासह शेकडो पुरुषांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. 

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, शिवसेना वकील संघटनेचे सभासद ॲड. अमर पटवर्धन, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, शहर संघटक अरविंद कडव, विभाग प्रमुख महेश गुरव, विभाग प्रमुख अनिल तळवनेकर विभाग समन्वयक संजय कानडे, उपविभाग प्रमुख तुषार निधाळकर, शाखा प्रमुख किरण ढवळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image