वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर, 18 जानेवारीला होणार बक्षीस वितरण....

वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर, 18 जानेवारीला होणार बक्षीस वितरण...

 पनवेल / वर्ताहर - : रायगड जिल्हा वैश्य समाज संघ,यांच्यातर्फे रायगड जिल्ह्यातील वैश्य वाणी समाजातील सर्व विद्यार्थी व बांधवांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली. प्रत्येक गटातून दोन क्रमांक काढले गेले. 1 ली ते थीसाठी  मी जेवताना टीव्ही/ मोबाईल बघावा का हा विषय देण्यात आला.यात प्रथम क्रमांक  सिद्धी संतोष चौधरी आणि द्वितीय क्रमांक प्रयाग प्रतीक झिंजे याचा आला. वी ते वीसाठी मी कोणत्या  माध्यमातून (मातृभाषा की इंग्रजी) शिक्षण घ्यावे हा विषय होता.  यात प्रथम क्रमांक अर्णव दिलीप मनोरे तर द्वितीय क्रमांक नीरज राजेंद्र चौधरी  याला मिलाला.  वी ते 12 वी साठी विद्यार्थी म्हणून आई वडिलांच्या माझ्याकडून काय अपेक्षा असाव्यात हा विषय देण्यात आला. यात प्रथम क्रमांक श्रावणी प्रशांत तेलवणे, द्वितीय क्रमांक रिया राजेंद्र चौधरी यांचा आला. तर वय वर्षे 20 व त्या पुढील खुला गटसाठी मी आणि माझा वैश्यवाणी समाज (माझी कर्तव्ये आणि अपेक्षा) हा विषय देण्यात आला. यात प्रथम क्रमांक  शिवानी मंगेश भोपतराव,व्दितीय क्रमांक अवधूत अरुण चौधरी यांचा आला. 18 जानेवारी 2023 रोजी कर्जत येथे होणाऱ्या महिला मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात याचे बक्षीस वितरण होणार आहे. भाग घेतलेल्या सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. सर्व परीक्षकांना मान्यवरांचा हस्ते गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भावना तांडेल, गोडसे व हांडे, नवी मुंबई यांनी परीक्षक म्हणून उत्कृष्टपणे काम केले. खुल्या गटासाठी जनता ज्युनिअर कॉलेज खोपोलीचे प्राध्यापक धर्मेंन्द्र म्हात्रे व दत्ता कांबळे यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली.

Comments