शुद्धलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ....
शुद्धलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ....

पनवेल / दि.१५ (वार्ताहर) : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

राज्यातील सर्व स्तरांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” उत्साहात साजरा करण्याबाबत शासन परिपत्रक काढले आहे. या निमित्ताने के.गो.लिमये सार्व. वाचनालय व ग्रंथालय पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शुद्धलेखन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. सर्वप्रथम संस्थेच्या अध्यक्षा ऍड. सुनिता जोशी यांनी मराठी भाषा संदर्भात माहिती सांगितली. भगिनी समाज पनवेल यांच्या रजनी भानू यांनी त्यांच्या संस्थेच्या वटवृक्षा बद्दल माहिती दिली. 
तसेच मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष रोहिदास पोटे यांनी शुद्धलेखना संबंधी मार्गदर्शन केले. ६० वर्षावरील व ६० वर्षाखालील असे दोन गट या स्पर्धेसाठी करण्यात आले होते. यामध्ये ६० वर्षे वरील पुढच्या गटामध्ये प्रथम क्र. वंदना दाते, द्वितीय क्र. उर्मिला सप्रे, तृतीय क्र. स्मिता गोखले यांनी पटकावले तर ६० वर्षे खालील गटामध्ये प्रथम क्र. अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, द्वितीय क्र. स्वाती चितळे तसेच तृतीय क्र. आदिती मराठे यांनी पटकावला. 

या कार्यक्रमा प्रसंगी नागनाथ डोलारे, के.गो.लिमयेचे उपाध्यक्ष श्याम वालावलकर, सहकार्यवाह सौ.जयश्री शेटेय, अॅड. माधुरी थळकर, ग्रंथपाल निकेता शिंदे ,लिपिक संपदा जोशी, भगिनी समाज पनवेल या संस्थेच्या अध्यक्षा मनिषा भिडे, उपाध्यक्षा रजनी भानू, सचिव वैशाली कुलकर्णी उपस्थित होत्या.



फोटो : के गो लिमये वाचनालयात शुद्धलेखन स्पर्धेला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
Comments