पनवेलमध्ये "भगवान वाल्मिकी भवन” उभारण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी..
 बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी..

पनवेल / दि.०३ (वार्ताहर) : पनवेलचे स्वच्छता दूत अशी ओळख असणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पनवेल मध्ये "भगवान वाल्मिकी भवन" उभारण्यात यावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
पनवेल परिसरामध्ये शेकडो वर्षांपासून वाल्मिकी समाज वास्तव्यास आहे. पनवेल परिसरात या समाज बांधवासाठी एकही हक्काची अशी वास्तू नाही. परिणामी या समाजातील सर्व शुभकार्ये व इतर समारंभ रस्त्यावर आयोजित करावी लागतात. यासमाजासाठी पनवेलमध्ये भगवान वाल्मिकी भवन उभारण्यात यावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण व पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या भवनासाठी १ कोटीच्या निधीची मागणी देखील केली आहे. 



फोटो : प्रसाद सोनावणे
Comments