एम के इलेव्हन संघ विजयी ...
पनवेल वैभव / दि. २१ ( संजय कदम ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रभाग क्र १८ शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक वर्ष २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा शहरातील एम के इलेव्हन संघाने जिंकली असुन त्यांना तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यंदाचे या स्पर्धेचे ११ वे वर्ष असून या स्पर्धेचे उदघाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला यांच्या हस्ते केला. यावेळी आयोजक व शहर प्रमुख पनवेल अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जाधव, पत्रकार संजय कदम, पत्रकार केवल महाडिक, मा नगरसेवक विश्वास म्हात्रे, मा नगरसेवक अनिलकुमार कुळकर्णी, महिला आघाडी शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, विभागप्रमुख अमित माळी, शाखाप्रमुख शुभम माळी, उपशाखाप्रमुख राकेश भगत, उपशाखाप्रमुख राज मांडवकर, ज्येष्ठ शिवसैनिक अरुण ठाकूर, चैतन्य शेट्ये, जोशी, यतीन मानकामे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यास्पर्धेत पनवेल शहरातील एकूण १६ संघ सहभागी झाले होते . यावेळी एम के इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक तर जागृती मित्र मंडळ संघाला द्वितीय क्रमांक मिळावला . यावेळी आयोजक व शहर प्रमुख पनवेल अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जाधव, सन्नी टेमघरे , संकेत बुटाला ,ऍड. अमर पटवर्धन , विभाग प्रमुख अमित माळी ,शुभम माळी ,राकेश भगत ,प्रसाद नलावडे ,हरिश्चंद्र बोडकर ,राहुल तुपे , अविनाश बोडकर, सुरेश कोटारिया, कुणाल भालेकर ,मयूर विधाते ,केतन नलावडे ,तेजस माळवदे , रोहित जाधव , अक्षय माळी ,चेतन डुकरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .
फोटो : बक्षीस समारंभ