रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिट तर्फे किफायतशीर दरात करण्यात आल्या तपासण्या...
रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिट तर्फे किफायतशीर दरात करण्यात आल्या तपासण्या... 

पनवेल / दि.१६ (वार्ताहर) : सध्या जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयाचे ठोके वाढणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्याने अचानक मृत्यूच्या घटनेत वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांसाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिटतर्फे संपूर्ण शरीर प्रोफाइल तपासणी व 2 डी इको चाचण्या अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध देण्यात आल्या आहेत. या महातपासणी शिबिराचे माजी प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
या तपासणी शिबिरामध्ये यकृत प्रोफाइल, लिपिड प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी, थायरॉईड चाचण्या, मधुमेह चाचण्या, ग्लायसेटेड हिमोग्लोबिन, संपूर्ण रक्त गणना आणि इतर चाचण्या सिटीएल लॅब मार्फत करण्यात आल्या. या शिबिराचा लाभ 65 नागरिकांनी घेतला तर सुमारे 40 हुन अधिक नागरिकांचे 2 D इको चाचणी करण्यात आले. यावेळी डॉ. मंगेश डाके, डॉ. पुष्कर लिखिते, डॉ. नीलेश बांठिया, डॉ. नील, डॉ. स्वाती लिहिते, आणि डॉ. मनोज मुनोत, सचिन बंठिया, महेंद्र सुराणा, आदित्य जोशी, मंजुश्री पटवर्धन आदी उपस्थित होते.



फोटो : रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिटतर्फे किफायतशीर दरात करण्यात आल्या तपासण्या
Comments