तक्का गाव ते विचुंबे कडे जाणारा भुयारी मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी...
भुयारी मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी...  

पनवेल / दि.०७ (संजय कदम) : तक्का गाव ते विचुंबे कडे जाणारा भुयारी मार्गावर पनवेल शहर वाहतुक शाखेकडून वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्याकरीता पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन पनवेल शहर वाहतुक शाखेकडून करण्यात आले आहे. 
पनवेल रेल्वे स्टेशन तक्का ते विचुंबे कडे जाणारा भुयारी मार्गावर रेल्वे ट्रॅकचे दुपदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. सदरचे काम अंदाजे सहा महिने चालु राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अपघात व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पनवेल शहर वाहतुक शाखेकडून तक्का गाव ते विचुंबे कडे जाणारा भुयारी मार्गावर पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्याकरीता एचडीएफसी सर्कल या मार्गाचा वापर करावा असे आवाहन पनवेल शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी केले आहे. तसेच यासंदर्भात वाहतूक शाखेकडून आवाहनाचे माहितीपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.  



फोटो : वाहतूक आवाहनपत्र
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image