पनवेल / प्रतिनिधी - : पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून शुश्रूषा सुपरस्पेशालिटी रुग्णालय-पनवेल, डॉ.डी. जी पोळ फाउंडेशन व वाय.एम.टी आयुर्वेद रुग्णालय-खारघर यांच्या वतीने उरण तालुक्यातील पिरकोन येथे पंचरत्न इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांचे सहकारी रोहन अरविंद गावंड व त्यांच्या पत्नी रसिका रोहन गावंड या दाम्पत्यांनी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिरकोन येथील डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील , विद्यालयातील गरीब, गरजू असे एकूण १०४ विद्यार्थ्यांची वार्षिक फी एकूण ४२ हजार २४० एवढी फी भरली. कला, क्रीडा, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रीतम म्हात्रे यांचे सहकारी देखील समाजसेवा करत असल्याचे पाहून त्याना अभिमान वाटला.
यावेळी कार्यक्रमास कलावती गावंड (मा.जी. प सदस्या), अनंता हरिश्चंद्र गावंड (चेअरमन पंचारत्न इंग्रजी माध्यम), स्वामीनाथ गावंड, निखिल गावंड (सदस्य), कमलाकर गावंड। (सदस्य), अंकित पाटील(सदस्य), रसिका ठाकूर (सदस्य), प्रियांका पाटील (सदस्या), दशांकी गावंड, रसिका गावंड, जगदीश गावंड , मनिराम गावंड, अनंत हरी गावंड,धनंजय पाटील, प्रदीप पाटील, बारदाना जोशी, भाई पाटील, रोहन गावंड , जगदीश पाटील, नम्रता गावंड (सदस्य) , यु. व्ही. जगताप (मुख्याध्यापक,क.भा.पाटील विद्यालय), सर्व शिक्षक, रूपाली म्हात्रे(मुख्याध्यापिका,पंचरत्