लहान मुलीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी अटक...
लहान मुलीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी अटक...

नवी मुंबई / वर्ताहर : -  नवी मुंबई आयुक्तालया मधील नेरूळ पोलीस ठाणे गु.र.नं. ४९१/२०२२ भादवि.३७६,५०६, पोक्सो ४ प्रमाणे दाखल गुन्हा करण्यात आला आहे. त्यात बालाजी उघान येथे टुश्यन संपल्यानंतर एक अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रांबरोबर रात्री 8.30 वा येथे बसली असतांना यातील आरोपी याने त्या मुलांना धमकावुन त्यांना तो पोलीस असल्याचे सागितले पैसे मागितले परंतु त्या मुलाकडे पैसे नसल्याने आरोपीने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला म्हणुन तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदरचे गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा.पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त मोहिते , अपर पोलीस आयुक्त गुन्हे,महेश घुर्ये , पोलीस उपआयुक्त गुन्हे अमित काळे यांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे सहा.पोलीस आयुक्त विनायक वस्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष 3 गुन्हे शाखेकडून वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी गुन्हा घडलेपासून समांतर तपास सुरू होता. गुन्ह्यातील आरोपीने कोणताही पुरावा ठेवला नव्हता त्याबदल काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त होत नव्हती पिडीत हिने गुन्हा करणारा याने तो पोलीस असल्याचे सांगितले होते म्हणून  रायगड ठाणे नवी मुंबई यातील अशाप्रकारचे गुन्हे करणारे पोलीस  बदल माहिती घेत असतांना आरोपीचे वर्णन हे संतोष नरवाडे शी मिळते जुळते असल्याचे लक्षात आले, दरम्यान गुन्ह्याचे घटनास्थळ परिसरातील सुमारे 35 ते 40 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, अभिलेखावरील आरोपी तसेच तांत्रिक तपासाआधारे गोपनीय माहिती मिळवून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच औरंगाबाद येथे संपर्क साधून संशयित आरोपी इसम नामे संतोष सर्जेराव नरवडे याचे बाबत तांत्रिक व गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण रीतीने माहिती प्राप्त करण्यात आलेली होती. 
सदर आरोपी विरूध्द याअगोदर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याने व तो पोलीस दलात होता म्हणून त्याने गुन्हा करतांना कोणताही पुरावा राहणार नाही याची काळजी त्याने घेतली होती व तो कायम मोबाईल बंद ठेवत होता तो कोणाचेही संपर्कात नव्हता तरी सदर माहितीचे आधारे कक्ष ३ चे तपास पथकाने दि.०२/०१/२०२३ रोजी पासून दिवस रात्र सातत्याने अंधेरी परिसरात कार्यरत राहून नमूद आरोपीस दि.०६/०१/२०२३ रोजी ताब्यात घेण्यात आलेले होते. नमुद आरोपीबाबत कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास केला असता त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून आलेले आहे. 
      
परंतु सदर आरोपी पोलीस कस्टडीत असतांना गुन्ह्याची कबुली देत नव्हता याअगोदर NRI पोलीस ठाण्यात त्याचे विरूध्द दाखल गुन्हयात त्याने कबुली दिली नसुन तो कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नव्हता त्याला वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व  API ईशान खरोटे ह्यांनी विश्वासात घेऊन  त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा कसा केला याबद्दल सविस्तर तंतोतंत फिर्यादीतील हकिकत प्रमाणे खरी हकिकत सांगितली सध्या आरोपी हा पोलीस कोठडीत आहे.
 गुन्हयात आरोपीनी कोणताही पुरावा ठेवला नसल्याने काहीएक उपयुक्त माहिती मिळत नसल्याने गुन्हा उघडकीस आणणेबाबत नवीमुबंई पोलीसासमोर मोठे आव्हान होते मा पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे ह्यानी क्राईम ब्रँच ला तपास करण्याचे आदेश दिले सहपोलीस आयुक्त महेश धुर्य यांनी पोलीस उपायुक्त अमित काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त  यांचे नेतृत्वाखालील युनिट 3 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना संमातर तपास करणेबाबत सुचना दिल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे सागर पवार व अंमलदार यासर्वानी  दिवसरात्र सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली आहे.
Comments