सत्याग्रह महाविद्यालयात “नव शिक्षण धोरण २०२० आणि अर्थिक गरिबांचे शैक्षणिक भवितव्य” यावर चर्चासत्राचे आयोजन...
शैक्षणिक भवितव्य यावर चर्चासत्राचे आयोजन...
पनवेल / दि.१५ (वार्ताहर) : खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाने डा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार दिनांचे औचत्य साधून नव शिक्षण धोरण 2020 आणि अर्थिक गरिबाच शैक्षणिक भवितव्य यावर चर्चासत्राचे आयोजन शांताबाई रामराव सभाग्रह येथे करण्यात आले होते. या चर्चा सत्राचे उद्घाटन पाली आणि बुद्धीझम विभागाच्या प्रमुख प्रा. सुनिता वानखेडे यांनी दिप प्रज्वलन करून केले. या चर्चा सत्रात प्रा. नेहा राणे, डॉ. निधि अग्रवाल, प्रा. ललिता यषवते, प्रा. संदिप पांडे, प्रा प्रणित जाधव, प्रा. काव्या पाल, प्रा. निषा भक्त, प्रा. एलोरा मित्रा यांनी सहभाग घेतला. 
 भारतात 12 व्या षतकापासून 19 व्या षतकापर्यंत उच्च शिक्षणाची सोयच नव्हती. त्यामुळे भारत विकसित देषाच्या रांगेत आजही नाही. नव्या शिक्षण धोरणात आर्थिक गरिबाला उच्चशिक्षण  मिळण्याची हमी नाही असे मत सुनिता वानखेडे यांनी व्यक्त केले. तर प्रा. संगिता जोगदंड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थेत शिकले. त्यांना बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड यांनी अर्थिक पाठबल दिले. सरकारने अर्थिक धोरणाची प्राथमिकता बदलुन उच्च शिक्षण, आरोग्य, शांतीसाठी गुंतवणूक याला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. नवशिक्षण धोरण भांडवलशाहीला हातभार लावणार आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बलाचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असून सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंनुशगांने सामाजिक न्यायाच्या योजनात फेर बदल करणे सरकारचे संविधानीक कर्तव्य आहे अन्यथा हे धोरण देशाच्या एकात्मतेला तडा देणारे ठरेल असे सांगितले.  चर्चा सत्रात सर्व मान्यवरांनी नव शिक्षण धोरण भांडवलदाराला लाभाचे आणि अन्य सर्वाच्या हिताविरोधात असल्याचा सूर होता. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. जी. के. डोंगरगावकर, प्रा.वनिता सुर्यवंषी उपस्थित होते. 



फोटो : सत्याग्रह महाविद्यालयात नव शिक्षण धोरण 2020 आणि अर्थिक गरिबाच शैक्षणिक भवितव्य यावर आयोजित चर्चासत्र
Comments