वैश्य वाणी समाज मंडळ कळंबोली व ग्रामीण विभागातर्फे पारितोषिक वितरण संपन्न...
वैश्य वाणी समाज मंडळ कळंबोली व ग्रामीण विभागातर्फे पारितोषिक वितरण संपन्न...
 पनवेल /वर्ताहर - : वैश्य वाणी समाज मंडळ कळंबोली व ग्रामीण विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला हळदी कुंकू समारंभ शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल, कळंबोली या विद्यालयाच्या संकुलात संपन्न झाला. सभेचे अध्यक्ष स्थान दिलीप चौधरी यांनी भूषवले. या सभेसाठी रायगड, वैश्य वाणी समाज संघाचे अध्यक्ष अशोक भोपतराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रायगड वैश्यवाणी समाज मंडळाच्या महिला अध्यक्षा शामल आंग्रे, रंजना वाणी, संगीता लाड, दत्तात्रेय  तांबोळी, नाना आंग्रे, प्रदीप (बापू) दलाल, दिलीप आंग्रे यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चौधरी यांनी केले.

           या सभेदरम्यान समाज मंडळातील महिलांचा हळदीकुंकू समारंभ तसेच इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या तसेच कर्जत येथे झालेल्या रायगड जिल्हा सांस्कृतिक मेळाव्यामध्ये पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धा, उखाणे स्पर्धा, तसेच  नृत्य स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या समाज मंडळातील सर्व स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या समाजातील दानशूर व्यक्तींना देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

       रायगड जिल्हा महिला सांस्कृतिक मेळाव्यामध्ये झालेल्या नृत्य स्पर्धांमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या कळंबोलीतील महिला गटाचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून समाजाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कळंबोली गटाकडून होत असलेल्या प्रशासनीय कार्याबद्दल सर्व उपस्थितांनी  संपूर्ण कळंबोली वैश्यवाणी समाजावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला.  हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळंबोली समाज मंडळातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम नियोजनबद्ध रीतीने पार पाडला. यावेळी कै. अशोक साखरे,  वैश्यवाणी  समाज मंडळ कळंबोली व ग्रामीण विभागाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या कुटुंबियाना कळंबोली गटांकडून मरणोत्तर सन्मानपत्र बहाल करण्यात आले.  सभेच्या शेवटी कमलेश चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.
Comments