पनवेल शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे बॉम्बस्फोट होणार अशी खोटी माहिती देणाऱ्याचा भांडाफोड...
खोटी माहिती देणाऱ्याचा केला भांडाफोड...


पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या तत्परतेमुळे बॉम्बस्फोट होणार अशी खोटी माहिती देणाऱ्याचा अखेरीस भांडाफोड केला आहे .
              पनवेलमध्ये मद्यपान करून भांडण करणाऱ्या व्यक्तीने पोलिस स्टेशनला फोन करून मला दहा जणांनी मारहाण केली आहे. त्यांच्याकडे संयशास्पद बॅग असून ते उद्या बॉम्बस्फोट करणार असल्याची तक्रारी दिली. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी शहानिशा केली असता तक्रारदाराने दारूच्या नशेत खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आले आहे.मुंबईत काळाचौकी परिसरात राहणारा ए.बी. हंकारे हा पत्नी व अजून एक सहकाऱ्यासोबत पेणकडे जात होता. पनवेल येथे बुधवारी रात्री ९ वाजता त्याचे दारू पिऊन इतर प्रवाशांबरोबर भांडणे केली. जवळपास दहा जणांनी त्याला मारहाण केली यानंतर हंकारे याने पोलिस नियंत्रण कक्षामध्ये फोन केला. मला मारहाण केली जात आहे. मारहाण करणारांकडे बॅग असून ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बॉम्बस्फोट करणार असल्याची माहिती दिली.नियंत्रण कक्षातून याविषयी माहिती पनवेल शहर पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी व त्यांचे पथक त्वरित घटनास्थळी पोचले व तेथील सुरक्षा रक्षकाला विचारले असता काही जणांचे येथे भांडण झाल्याचे सांगितले. तक्राराला संपर्क करून पोलिसांनी पेणच्या दिशेने जात असताना गाठले. त्याने मद्यप्राशन केले होते. चौकशीत त्याने मारहाण केल्यामुळे त्याने नियंत्रण कक्षामध्ये उद्या बॉम्ब स्फोट होणार असल्याची खोटी माहिती दिल्याचे सांगितले. अखेरीस सत्य बाहेर पडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
Comments