"तो" मधील "ती" आणि "ती मधील "तो" चा प्रवास फॅशन शो....
"तो" मधील "ती" आणि "ती मधील "तो" चा प्रवास फॅशन शो....

पनवेल / प्रतिनिधी : - 
नवप्रवाह फाऊंडेशन आणि कै.रघुनाथ आंबेरकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळ कळंबोली च्या प्रांगणात LGBTQ साठी फॅशन शो आयोजित केला होता.
       LGBTQ ना एक मंच मिळावा, त्यांच्या समस्या, अडचणी समाजापर्यंत पोहोचाव्या, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
          एकूण ०८ स्पर्धकांनी या फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता. ह्या शो मध्ये विजेता अमित गावंड, प्रथम उपविजेता विवेक जाधव, द्वितीय उपविजेता अझर पालेकर हे या शो चे विजेते झाले. या फॅशन शो चे परिक्षण राणी जैसवाल (माॅडेल), उमेरा शेख (माॅडेल), पवन गावंड यांनी केले. संपूर्ण शो ची कुरियोग्राफी लावणी सम्राट, पॅथालाॅजिस्ट ज्ञानेश्वर बनगर यांनी केली. 
          या घटकाला तृतीयपंथी न संबोधता LGBTQ हा शब्द वापरावा कारण प्रथम आणि द्वितीय असा कोणताच पंथ नसल्याने तृतीयपंथ हा शब्द चुकीचा वाटतो. 
         या फॅशन शो साठी नवप्रवाह फाऊंडेशन च्या अध्यक्षा अरुणा सावंत, प्रिती सावंत, मिना राय, सुजाता बत्तीन विघ्नहर्ता आॅईल अॅण्ड केमिकल चे बाळासाहेब हांडे, रमेश राव यांचे सहाय्य लाभले. 
      संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थेच्याअध्यक्षा माधुरी आंबेरकर संस्थेचे खजिनदार अमोल आंबेरकर व सचिव अमित कुलकर्णी यांनी केले. ऋतिक महाडकर, अनिकेत कुवेसकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच नवप्रवाह फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून  विविध उपक्रम राबविले जातात. महिला सक्षमीकरण, वस्तीतील मुलांना शिक्षण, जेष्ठ नागरिक संघ,आरोग्य अशा विविध उपक्रम राबविण्यात कार्यरत आहे.
Comments