नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिर...
पनवेल ( प्रतिनिधी) : मावळ लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेनेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्फत मध्यवर्ती कार्यालय कळंबोली येथे ता.16 रोजी मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकीय जीवनात काम करत असताना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उक्ती प्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण व विस टक्के राजकारणाचा वसा घेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम करत असताना सामाजिक कार्याचा वसा घेतलेले जिल्हासंपर्कप्रमुख रामदास शेवाळे समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस आरोग्य शिबिर राबवून साजरा केला होता. त्याच प्रमाणे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्तही मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिर राबविण्यात आले होते.
या शिबिराला कळंबोली व परिसरातील शेकडो महिला व पुरूषांनी लाभ घेतला. शिबिरा दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत 100 पेक्षा जास्त मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या वेळी माजी नगरसेवक बबन मुकादम, उप जिल्हा संघटक आबासो लकडे, शहर प्रमुख तुकाराम सरक, रोडपाली शहर अध्यक्ष नारायण फडतरे, रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके, संजय शेडगे, महेश गोडसे, निलेश दिसले, आनंदा माने, रणजित फडतरे, शुभम गोडसे, नारायण पिलाणे, विजय जाधव, गणेश कामटे तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.