रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा हॅपी स्कुल उपक्रम...
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा हॅपी स्कुल उपक्रम...
पनवेल / प्रतिनिधी - :   रोटरी ही संपुर्ण जगभर कार्यरत असलेली एक सामाजिक संस्था आहे. आणि रोटरीचा हॅपी स्कुल आणि हॅपी व्हिलेज असा एक महत्वाचा अव्हेन्यू आहे.

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या हॅपी स्कुल उपक्रमा अंतर्गत क्लबच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, फणसवाडी पालेबुद्रुक या शाळेत विविध सुविधा पुरविण्यात आल्या.
 शाळेची डागडुजी करून शाळेला छान रंगरंगोटी करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात बोरिंग मारून पाणी पुरवठा करण्यात आला आहे .तसेच विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्यासाठी वॉटर प्युरीफायर बसविण्यात आला आहे. शाळेत दुरांत शिक्षणासाठी प्रोजेक्टर व स्क्रीन देण्यात आला आहे. शारीरिक शिक्षणा साठी आणि खेळण्यासाठी विविध प्रकारच्या खेळांचे साहित्य उदा. लेझिम, क्रिकेट बॉल, बॅट, कॅरम बोर्ड, फुटबॉल इतर पुरविण्यात आले आहे. शाळेच्या सभोवताली झाडे लावण्यात आली आहेत व छान पैकी लाकडी कुंपण घालण्यात आले आहे.  

हॅपी स्कुलचे शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी रोटरी प्रांत 3131चे प्रांतपाल डॉ. अनिल परमार, माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव अनिल ठकेकर , पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, सरपंच भोईर, पाले बुद्रुक हायस्कूलचे मुख्याध्यापक कुंभार सर, सदर प्रोजेक्टचे चेअरमन ऋषिकेश बुवा यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले . 

सदर उपक्रमा वेळी ग्रामपंचायत सदस्य भगत, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ पाटील, फणसवाडी चे सर्व आदिवासी ग्रामस्थ, रोटरी क्लबचे सदस्य माजी अध्यक्ष डॉ. आमोद दिवेकर, संतोष घोडींदे, डॉ. रमेश पटेल, डॉ. लक्ष्मण आवटे, भावी अध्यक्ष रतन खरोल,सदस्य दीपक गडगे, प्रितम कैया, विक्रम कैया, सुदीप गायकवाड, अतिष थोरात, अमित पुजारी , गजानन जोशी, सायली सातावळेकर , अनिल खांडेकर, आरती खेर यांचे सह क्लबच्या प्रथम नारी, पुष्पलता पाटील, ज्योती गडगे,  वृषाली पोटे,  मोना खरोल ,  अंकिता खांडेकर , शाळेच्या मुख्याध्यापिका सरगर मँडम व शिक्षिका गावंड मँडम आणि शाळेतील सर्व विध्यार्थी, व कर्मचारी उपस्थित होते .
Comments