"रोटरी घनदाट जंगल" ची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर...
"रोटरी घनदाट जंगल" ची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर...

पनवेल / वार्ताहर - :    पनवेलकरांचे स्वप्न असलेल्या आणि पनवेल शहराच्या मध्यभागी वाढत असलेल्या नियोजित "रोटरी घनदाट जंगल" ची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचल्याचे दिसत आहे. कारण या उपक्रमाची दखल घेत रोटरी आंतरराष्ट्रीय TRF - CHAIR रो . IAN RISLEY यांनी या उपक्रमाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु भारतात आल्यानंतर तब्बेत बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांच्या  बरोबरच येण्याचे आश्वासन दिलेल्या TRF - Trustee रो . डॉ. भरत पंड्या यांनी या उपक्रमाला भेट दिली.
या भेटीमध्ये त्यांनी स्वतः वृक्षारोपण केले आणि रोटरी इंटरनॅशनल चे TRF - CHAIR रो. Ian Risley  यांच्या वतीने सुद्धा वृक्षारोपण केले .
वृक्षारोपणा नंतर 
TRF - Trustee रो .डॉ . भरत पंड्या यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून उपस्थित रोटरी सदस्यांचे कौतुक केले .
तसेच उपक्रमाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन परत भविष्यात या उपक्रमाला भेट देण्याचे अश्वासन दिले . या वृक्षारोपणाच्या वेळी Ditrict 3131 चे गव्हर्नर रो. डॉ. अनिल परमार हे सपत्नीक उपस्थित होते .या संपूर्ण भेटीचे संयोजन रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल चे मार्गदर्शक डॉ .गिरीश गुणे यांनी केले होते .

 या वेळी क्लबचे मार्गदर्शक डॉ . गिरीश गुणे , अध्यक्ष रो. लक्ष्मण पाटील , फर्स्ट लेडी पुष्पलता पाटील , रो. डॉ. संजिवनी गुणे, सचिव रो. अनिल ठकेकर , रो. सैतवडेकर , रो . डॉ. अमोद दिवेकर , रो . डॉ लक्ष्मण आवटे , रो. भगवान पाटील , रो. प्रकाश रानडे , रो .मेघा तांडेल , रो. अनिल खांडेकर , रो . विवेक वेलणकर , रो. संतोष घोडीनदे , रो. अतिष थोरात , रो. सचिन वेरणेकर यांनी हजेरी लावली .
Comments