पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोटारसायकल चोरीचा प्रयत्न फसला...
पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोटारसायकल चोरीचा प्रयत्न फसला...

पनवेल / दि.२४ (संजय कदम) : पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दुचाकी वाहन चोरीचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी इ-चलन द्वारे मूळ मालकाशी संपर्क साधून मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. 
मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर पळस्पे वाहतूक केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बुरकुल, उपनिरीक्षक केसरकर, पळस्पे मोबाईल केंद्राचे अंमलदार भगत, परदेशी, महाजन या आपल्या पथकासह नेहमी प्रमाणे पेट्रोलिंग करीत असताना आरोपी साहिल यादव (वय १८) हा होंडा ॲक्टिवा मोटारसायकल चालवत घेऊन जात असताना आढळून आला. द्रुतगती महामार्गावर मोटर सायकला परवानगी नसल्याने त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र तो न थांबता पळू लागल्याने त्याचा पाठलाग करून देवद गाव येथे त्याला थांबवण्यात आले. त्याचे लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता तो समर्पक माहिती न देता उडवाउडची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे याबाबत संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन इ-चलन डिवाइस साह्याने गाडीच्या मूळ मालकाचा संपर्क क्रमांक शोधून त्यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधला असता सदर गाडीचे मालक महेंद्र गोसावी (रा.मुंबई) यांनी सदरची मोटरसायकल चोरीला गेल्याचे सांगितले तसेच त्याबाबत  भोईवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी साहिल यादव व चोरीस गेलेली मोटरसायकल यांना ताब्यात घेऊन पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत म्हेत्रे व पथकाच्या ताब्यात दिले.






फोटो : मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीसह पळस्पे केंद्राचे अधिकारी
Comments