दिव्यांग ,ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना एनएमएमटी कडून बस सवलत ; आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रयत्नांना यश....
आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रयत्नांना यश....


पनवेल / दि.०७ (वार्ताहर) : पनवेल पालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तीना मोफत तर ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थाना नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बसेस मध्ये पंन्नास टक्के बस सवलत सुरु केल्यामुळे दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने एनएमएमटी तोट्यात असल्याचे कारण सांगून 2016 साली नवी मुंबई बाहेर राहणाऱ्या विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी परिवहन सेवेत 75 टक्के असलेली प्रवासी भाड्यातील सूट पन्नास टक्क्यांवर आणली. नागरिकांनी विरोध करूनही नवी मुंबई महापालिकेने निर्णय बदलला नाही. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेने  2018 साली पन्नास टक्क्यांची सवलत देखील बंद केली. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्र, पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी जाळे निर्माण केलेल्या एनएमएमटी बससेवेत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना सवलत मिळणे बंद केली होती. दरम्यान यावेळी पालिकेच्या सर्व साधारण सभेत काही नगरसेवकांनी एनएमएमटीकडून हा दुजाभाव का केला जात असून पालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिके सोबत चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यात यावे अशी मागणी केली होती, यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थाना एनएमएमटी बस मध्ये सवलत मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन देवून  सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून केला. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाकडे पाठपुरावा करून जानेवारी महिन्यापासून पनवेल पालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तीना मोफत ,तर ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थाना नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बसेस मध्ये पंन्नास टक्के बस सवलत सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे दिव्यांग व्यक्ती,ज्येष्ठ नागरिक आणि विध्यार्थी समाधान व्यक्त करीत आहे.

प्रतिक्रिया - बस सवलतीसाठी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थांनी पालिका हद्दीत वास्तव्य करीत असल्याचे कागदपत्र घेवून पालिकेच्या पनवेल येथील मुख्य कार्यालयातील समाज विकास विभागात संपर्क साधावा. - प्रकाश गायकवाड (अधीक्षक ,समाज विकास विभाग पनवेल महानगर पालिका)

हा निर्णय निश्चितच स्वागतार्य आहे. 
पालिका प्रशासनाचा यशस्वी पाठपुराव्याचा फायदा पनवेलकराना होणार आहे. - भरत कोरडे (नागरिक, कळंबोली)
Comments